Jeremiah 22

1परमेश्वर असे म्हणतो, “यहूदाच्या राजाच्या घरास खाली जा आणि हे वचन तीथे घोषीत कर: 2आणि तू असे म्हण, ‘यहूदाच्या राजा, जो तू दावीदाच्या सिंहासनावर बसतो, तो तू परमेश्वराचे वचन ऐक, आणि तू, तुझे चाकर आणि तुझे लोक जे या दारातून आत जातात, तेही ऐको. 3परमेश्वर असे म्हणतो, “न्याय आणि न्यायीपण कर, आणि जो कोणी लूटलेला आहे, त्याला पीडणाऱ्याच्या हातातून सोडव. तुझ्या देशात राहणाऱ्या परदेशी, अनाथ, विधवा, कोणालाही त्रास देऊ नको, त्यांचे काही वाईट करू नको किंवा निरपराध्यांचे रक्त पाडू नको.

4कारण जर तुम्ही असे केले, तर दावीदाच्या सिंहासनावर बसणारे राजे यरुशलेममध्ये, त्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर, रथांतून आणि घोड्यावर स्वार या घराच्या दारातून आत जातील, तो व त्यांचे चाकर व त्याचे लोकही आत जातील. 5पण जर तुम्ही जे वचन मी बोलो ते ऐकले नाही, तर परमेश्वर असे म्हणतो पाहा, मा माझीच शपथ वाहतो की या राजवाड्यांचा नाश होईल.”

6कारण यहूदाचा राजाच्या राजवाड्याबद्दल परमेश्वर असे म्हणतो की,

गिलादा प्रमाणे वा लबानोनच्या शिखराप्रमाणे तू आहेस, पण तरीही मी त्याला वाळवंटामध्ये पालटून टाकीन.
निर्जन शहराप्रमाणे तो होईल.
7कारण मी तुझ्याविरूद्ध नाश करण्यास विध्वंसक पाठवायचे मी निवडले आहे.
शस्त्रांसहित मनुष्ये, ते तुझे चांगले गंधसरु तोडून त्यांना अग्नीत पाडतील.

8“अनेक राष्ट्रे या नगरीजवळून जातील. त्यातील प्रत्येक व्यक्ती आपल्या शेजाऱ्याला विचारेल ‘या भव्य नगरीच्या बाबतीत परमेश्वराने असे भयंकर कृत्य का केले?’ 9ह्यावर दुसरा उत्तर देणार, ‘यहूदातील लोक परमेश्वर देवाबरोबर झालेल्या कराराप्रमाणे वागले नाहीत. त्यांनी अन्य दैवतांना पूजले आणि त्यांच्या पाया पडले.”


10मेलेल्यां करिता रडू नको आणि शोक करू नको, परंतू जे कोणी पाडावपणात गेले आहेत त्याच्यासाठी रडा,

कारण तो परतून त्याची जन्मभूमी पुन्हा कधीही पाहणार नाही.

11कारण यहूदाचा राजा योशीयाचा मुलगा शल्लूम ह्याच्याबद्दल परमेश्वर असे म्हणतो: जो त्याचा पिता योशीया याच्याठिकाणी राज्य करीत होता, त्याने आपले ठिकाणा सोडले आहे आणि तो परत येणार नाही. 12ज्या ठिकाणी त्याला निर्वासित केले, तो तेथेच मरणार आणि तो पुन्हा कधी हा राष्ट्र पाहणार नाही.


13जो अनीतीने आपले घर बांधतो आणि आपली वरची माडी अन्यायने बांधतो, जो आपली सेवा मोल न देता करून घेतो, त्याला हाय हाय!

14जो कोणी असे म्हणतो, “मी माझ्यासाठी उंच असे घर आणि विस्तीर्ण माड्या बांधीन.”
जो आपल्यासाठी मोठ्या खिडक्या आणि असलेले घर बांधतो. तो तक्तपोशीसाठी गंधसरु वापरतो आणि तक्तपोशीला लाल रंग देतो. त्याला हाय हाय!

15तुझ्या घरात खूप गंधसरु आहे म्हणून चांगला राजा आहेस काय?

तुझे वडील खात, पीत नव्हते काय? तरी ते न्याय आणि नितीमानता करत असत. तेव्हा त्यांच्याबाबतीत सर्व सुरळीत झाले.
16तो गरीब व गरजूंचा बाजूने न्याय करीत असे. मला ओळखणे हेच नव्हे काय? परमेश्वर असे म्हणतो.

17पण तुझ्या दृष्टीस आणि हृदयात अनीतीने मीळवलेली मीळकत आणि निर्दोष व्यक्तीचे रक्त पाडणे,

आणि पीडणे व जूलूम करणे या शीवाय काही नाही.
18यास्तव यहूदाचा राजा, योशीया, याचा मुलगा यहोयाकीम ह्याविषयी परमेश्वर असे म्हणतो की, हाय! माझ्या बंधू, किंवा हाय! माझ्या बहिणी, असे बोलून ते त्याच्याकरीता शोक करणार नाही. “हाय! स्वामी! हाय! प्रभू! असे बोलून ते विलाप करणार नाही.
19एखाद्या गाढवाला पुरावे तसे यरुशलेममधील लोक यहोयाकीमचे दफन करतील.
ते त्याचा मृतदेह फरपटत नेऊन यरुशलेमच्या वेशीबाहेर फेकून देतील.”

20“लबानोनच्या डोंगरावर जाऊन मोठ्याने ओरड. बाशानच्या डोंगरात तुझा आवाज उंच कर.

अबारीमच्या डोंगरापासून ओरड, कारण तुझ्या सर्व मित्रांचा नाश केला जाईल.
21तू सुरक्षित असता मी तुझ्याशी बोललो, पण तू म्हणालीस, मी ऐकणार नाही.
तू तरुण असल्यापासून अशीच वागत आलीस. कारण तू माझी वाणी ऐकली नाहीस.

22वारा तुझ्या सर्व मेंढपाळांना लांब पाळील, आणि तुझे मित्र पाडावपणात जातील.

मग खरोखरच तू निराश होशील आणि तू केलेल्या सर्व वाईट गोष्टींची तुला लाजवली जाणार.
23जो तू राजा आहेस, तू आपल्या लबानोनाच्या राणात, जे तू गंधसरुमध्ये आपले घरटे करतोस,
पण जेव्हा तुला यातनांच्या प्रसूतिवेदना जसे बाळंतपणे होतात, तेव्हा तू कशी केवीलवाणी होशील.”

24“परमेश्वर म्हणतो, मी जीवंत आहे, यहोयाकीमचा, यहूदाच्या राजा, याचा मुलगा, कोन्या, जरी तू माझ्या उजव्या हातातील मुद्रा असलास, तरीही मी तुला उखडून टाकले असते. 25कारण मी तुला, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर व खास्दी, व जे तुझा जीव घेऊ पाहतात, आणि ज्यांना तू घाबरतो त्यांच्या हाती सोपवणार. 26मी, तुला व तुझ्या आईला, जीने तुला जन्म दिला, तिला जो राष्ट्र तुमची जन्मभूमी नाही तिथे फेकून देईन. तेथेच तुम्ही दोघे मराल.

27आणि तुम्ही या भूमीत परत यायला पाहाल, पण ते परत येणार नाही.”

28कोणीतरी फेकून दिलेल्या, फुटक्या भांड्याप्रमाणे कोन्या हा आहे काय? कोणालाही नको असलेल्या भांड्याप्रमाणे यहोयाकीन आहे काय?
तो व त्याची मुले का बाहेर फेकले आहेत? आणि माहीत नाही अश्या परक्या देशात त्यांना का फेकून देण्यात आले?

29हे भूमी, भूमी, भूमी, परमेश्वराचे वचन ऐक!

परमेश्वर असे म्हणतो, “यहोयाकीनाबद्दल हे लिहून घे. तो नि:संतान होईल,
‘तो त्याच्या दिवसात यशस्वी होणार नाही आणि त्याची कोणतीही संतान यशस्वी होऊन दावीदाच्या सिंहासनावर बसून यहूदावर राज्य करणार नाही.”
30

Copyright information for MarULB